काँग्रेसच्या जाफराबाद तालुका अध्यक्षपदी अजय बनकर ची निवड..

 



टेंभुर्णी प्रतिनिधी  विष्णु मगर 

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अजय बनकर यांची नियुक्ती महाराष्ट्र काँग्रेस चे प्रांताध्यक्ष श्री हर्षवर्धन  सपकाळ यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील यांनी नुकतीच जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी अजय बनकर यांना नियुक्तीपत्र देऊन तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. 

या पत्रात आपल्या भागातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करावे व तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना पक्ष बांधणी मजबूत करावी‌ ,  तसेच पंधरा दिवसाच्या आत आपल्या तालुक्याची कार्यकारणी तयार  करावी असे नियुक्तीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच जाफराबाद तालुक्याला काँग्रेस साठी तरुण व सुशिक्षित असा खेडेगावातील तळेगाव येथील अजय बनकर यांना तालुक्यातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाच्या वतीने संधी दिली गेल्याचे काही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याकडून बोलल्या जात आहे. त्यांच्या या निवडीची जाफराबाद तालुक्यातील काँग्रेस कार्त्यांनी अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment