राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार विनोद कळंबे यांना जाहीर.

  



 टेंभुर्णी प्रतिनिधी  विष्णु मगर 


         शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा राजे शिवछत्रपती राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार टेंभुर्णी ता. जाफराबाद येथील युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षक विनोद कळंबे यांना जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील  माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. श्री कळंबे हे खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविलेले आहेत. याशिवाय युगंधर प्रतिष्ठानच्या व कै.बापुराव पाटील कळंबे सेवाभावी संस्था आणि स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना आर्थिक मदतीसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. यापूर्वी देखील त्यांना जालना रत्न,  पहाट राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना राजे शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जाफराबाद तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.२४ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे आयोजित सोहळ्यात श्री कळंबे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment