जायंट्स ग्रुप ऑफ खुलताबाद कडून विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
आज दिनांक 15 जुलै 2025 मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड नंबर 1 मराठी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू नंबर 1,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड नंबर 3 या तीन शाळेत जायंट्स ग्रुप ऑफ खुलताबाद यांच्या कडून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक रेघी,दोन रेघी,चार रेघी,चौकटी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वह्याचे (नोटबुक) वाटप करण्यात आले* यावेळी जायंट्सचे दिनेश सावजी,प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप गायकवाड ,जायंट्स ग्रुप ऑफ खुलताबादचे अध्यक्ष सतीश कोळी, उमाकांत दाभाडे शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका कल्पना सूर्यवंशी,कन्नड नंबर 3 चे अर्चना पाटील मॅडम,सुवर्णा गायके मॅडम,उर्दू शाळेच्या फरहीन पठाण बाजी,कल्याण राऊत सह जायंट्स चे सदस्य उपस्थित होते.
या परिसरातील शाळेत दररोज हातावर व रोजंदारीवर काम करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पालकांची मुलं शिक्षण घेत असून आमच्या असे लक्षात आले की,मुल रोज फक्त एकच वही घेऊन येतात....अन् ही विद्यार्थी व पालकांची अडचण लक्षात घेऊन आज तिन्ही शाळेतील एकुण 100 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांचा चेहरा आनंदी दिसून आला.
No comments:
Post a Comment