'महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती'चे शिक्षण संचालकांना पत्र
खुलताबाद दि. 17 जून 2025
वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या खाती 10 दिवसाची अर्जित रजा जमा करणेबाबत 'महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती' कडून राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शिक्षण संचालक यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
वरिष्ठ निवड श्रेणीसाठी शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण ग्रीष्मकालीन सुट्टी कालावधीत दि. 2 जून 2025 ते 12 जून 2025 या 10 दिवसाच्या कालावधीत संपन्न झाले. ग्रीष्मकालीन दीर्घ सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झाल्याने नियमास अनुसरून शिक्षकांच्या खात्यात 10 दिवसाच्या रजा जमा करण्याची कार्यवाही करणेबाबत शिक्षक समिती कडून विनंती करण्यात येत असल्याचे राज्य शाखेकडून पत्राद्वारे करण्यात आली असल्याचे मराठवाडा विभागीय प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.
यापूर्वी 2023 मध्ये संदर्भित- 1 नुसार नाशिक विभागीय संचालक कार्यालयाने त्यांचे अधिनस्थ येणाऱ्या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना कळविले होते.
संदर्भित-2 नुसार कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांचे अधिनस्थ येणाऱ्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षणाचे खात्यात 10 दिवसाच्या अर्जित रजा जमा करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे पत्र निर्गत केले आहे.
निवेनात पुढे म्हटले आहे की,विभाग निहाय वेगवेगळे पत्र निर्गत करण्याऐवजी प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांच्या खात्यात 10 दिवसाच्या अर्जित रजा जमा करण्याचे आदेश राज्यात आपल्या स्तरावरून निर्गत करावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आग्रही विनंती करण्यात आली असल्याचे विभागीय प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले प्रसंगी जिल्हा अध्यक्ष विजय साळकर, रंजित राठोड, नितीन नवले,शामभाऊ राजपूत सह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment