पंढरपूर वारी २०२५ शिवसेना आयोजित वैद्यकीय शिबिर उत्साहात संपन्न...
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
पंढरपूर वारीच्या निमित्ताने, शिवसेना पक्षाच्या वतीने हेमंत बत्ते यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. "सेवा हीच खरी शिवसेना" या भावनेतून शेकडो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम राबवण्यात आला.
शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी रक्तदाब, शुगर, ताप, अंगदुखी इत्यादी प्राथमिक उपचार व वैद्यकीय सल्लामोफत औषध वितरण वृद्ध, महिला व बाल वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था इत्यादी सेवा पुरवण्यात आल्या .शेकडो वारकऱ्यांनी व स्थानिक रहीवाशी यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला. तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस व शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी मोठ्या सेवाभावाने सहभाग घेतला.या उपक्रमाद्वारे हेमंत बत्ते व शिवसेना यांनी समाजसेवेचा एक आदर्श ठेवल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांकडून व्यक्त झाली.या कार्येक्रमा साठी कोहकडे हॅास्पिटल यांचे डॅा गणेश केहकडे, डॅा अंजली कोहकडे डॅा सोनल माने त्यांचे सर्व सहकारी यांनी तपासणी केली
तसेच दिलीप देवकर पाटिल, कैलास सोनवणे ,शिवशाहीर गणपत कालकुटे, मोहन येले, सोपान नरवडे, श्रीरंग लंगे हे उपस्थित होतेकार्येक्रमाचे नियोजन मनोज अष्टेकर, गौरव कश्यप ,शरद कोल्हे प्रणव जोशी ,बालाजी शिंदे , उत्तम नार्वेकर, दिग्विजय बत्ते यांनी केलेकार्येक्रमाचे मुख्य संयोजक हेमंत बत्ते यांनी सर्वाचे आभार मानले.
No comments:
Post a Comment