उंब्रज तालुका कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान 2025 अंतर्गत समाधान शिबिर





पत्रकाराचे नाव: श्री महेश काशीद

दिनांक 26/6/2025. गाव उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा .मंडळ उंब्रज ता.कराड जि सातारा येथे आज दि २६/०६/२०२५ रोजी उंब्रज मंडळ मधील १७ गावातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान २०२५ अंतर्गत ग्रामपंचायत उंब्रज येथे शिवाजी सभागृह येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी मा सरपंच उंब्रज श्री योगराज जाधव मा सरपंच शिवडे श्रीमती शोभा कदम तसेच मंडळ अधिकारी उंब्रज ग्रामसेवक उंब्रज ग्रामसेवक कोर्टी ग्राम महसूल अधिकारी उंब्रज ,कोर्टी, अंधारवाडी, शिवडे ,तळबीड, चरेगाव , बेलवडे ह या सजाचे ग्राम महसूल अधिकारी व लाभार्थी खातेदार उपस्थित होते यावेळी पुढीलप्रमाणे योजनांचे नोंदी घेऊन खातेदार यांना उतारे वाटप केले .

अ क्र योजनेचे नाव करण्यात आलेल्या नोंदींची संख्या नोंदी केलेल्या गटांची संख्या लाभार्थी खाते दार संख्या

१ मयत खातेदार वारस नोंदी करणे १८५ ३४७ ४०३

२ ए कु म्या नोंदी कमी करणे १३५ ४१७ ५०२

३ अ पा क नोंदी कमी करणे २७ ७७ २७

४ तगाई बोजे नोंदी कमी करणे २६ २६ २६

५ भू विकास बँक बोजे नोंदी कमी करणे २२ २२ २२

६ म्हैस तगाई बोजे नोंदी कमी करणे ३८ ३८ ३८

७ सावकारी बोजे नोंदी कमी करणे २८ ० ०

८ लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत नोंदी करणे ५ ७ १०

९ आदिवासी लोकांना भूखंड वाटपाचे सातबारा वर नोंदी करणे ८ ८ १६

१० सातबारा वरील तुकडा नोंदी कमी करणे ६७ २१९८ २८१०

वरीलप्रमाणे मा जिल्हाधीकारीसो सातारा यांचे निर्देशानुसार व मा उपविभागीय अधिकारी कराड श्री अतुल म्हेत्रे सो व श्रीमती कल्पना ढवळे तहसिलदार कराड यांचे मार्गदर्शनाखाली शासन निर्णय ९/११/२०२२ नुसार भू विकास बँक बोजे नोंदी कमी करणे,शासन निर्णय ३१/१२/१९८८ ,नुसार तगाई बोजे कमी करणे ,शासन निर्णय ३०/०४/२०२५ नुसार अपाक शेरा कमी करणे , एकुम्या नोंद कमी करणे अशा प्रकारच्या वरीलप्रमाणे व माहे एप्रिल व मे २०२५ मध्ये नोंदी घेऊन त्याची निर्गती करून आज संबंधित खातेदार यांना फेरफार व सातबारा वाटप करण्यात आले . यावेळी सरपंच उंब्रज यांनी व मंडळ अधिकारी उंब्रज यांनी उपस्थिताना प्रलंबित वारस नोंदी व एकुम्या नोंदी तसेच इतर अनावश्यक सातबारावरील नोंदी कमी करणेबाबत संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी यांचेशी संपर्क साधून सूचना देण्याची विनंती केली.

No comments:

Post a Comment