५० हजारांची सोन्याची अंगठी परत करत अनिल सोनवणे यांनी दाखवला प्रामाणिकपणाचा आदर्श..!
शिरूर आजच्या घडीला स्वार्थ आणि बेईमानीने समाज झपाटलेला असताना, "जे आपले नाही ते ठेवू नये" ही शिकवण जगणारे लोक फार थोडे उरले आहेत. मात्र शिरूर येथील बो-हाडे मळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या हॉटेल वैभवचे मालक अनिल सोनवणे** यांनी आपल्या प्रामाणिक कृतीतून एक आदर्श घालून दिला आहे. ५० हजार रुपयांहून अधिक किमतीची सोन्याची अंगठी व महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे परत केली.
घटना अशी घडली की, रोजप्रमाणे रात्री हॉटेलची आवराआवर करून अनिल सोनवणे हे घरी जाण्यास निघाले असताना हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांना एक पाकिट सापडले. त्यांनी पाकिट उचलून तपासणी केली असता त्यामध्ये मूल्यवान सोन्याची अंगठी व महत्त्वाची ओळखपत्रे आढळली.दोन दिवस त्या पाकिटासाठी कोणी तरी येईल याची त्यांनी प्रामाणिकपणे वाट पाहिली. मात्र कोणीही न आल्याने, सदर पाकिट त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केले. पोलिसांच्या उपस्थितीत जे पाकिट हरवले होते त्या मूळ व्यक्तीस ते परत करण्यात आले.
या संदर्भात बोलताना अनिल सोनवणे म्हणाले,"आई-वडिलांची शिकवण आहे की बिनकष्टाचं, बिनमेहनतीचं धन नको. जे आपलं नाही ते परत देणं हेच योग्य. घामातून मिळालेला एक रुपयाही मौल्यवान असतो."त्यांनी पुढे सांगितले की, "जेव्हा अंगठी सापडली तेव्हाच ठरवलं की ही योग्य व्यक्तीकडेच परत पोहोचवायची. आपलं आपल्याला मिळेलच."
सध्या 'माझं ते माझं आणि तुझंही माझं' अशी प्रवृत्ती बळावलेली असताना अनिल सोनवणे यांचा प्रामाणिकपणा समाजासाठी एक प्रकाशस्तंभ ठरत आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, सोशल मिडिया व स्थानिक समाज माध्यमांमध्येही त्यांच्या या प्रामाणिक कृतीची चर्चा रंगली आहे.पार्किंगमध्ये सापडलेली अंगठी व कागदपत्रे दोन दिवस वाट पाहून पोलिसांच्या उपस्थितीत सुपूर्त आई-वडिलांच्या संस्कारातून प्रेरित होऊन घेतलेले प्रामाणिक निर्णय समाजात प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण
शेवटी एवढंच म्हणता येईल की –
प्रामाणिकपणा अजूनही समाजात शिल्लक आहे आणि अनिल सोनवणे यांसारखे लोक त्याचे खरे प्रतिनिधी आहेत
No comments:
Post a Comment