ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीर संपन्न

  


मलकापूर येथील तालुका क्रीडासंकुल मधे दि 15 मे  ते 5 जून या कालावधीत आयोजित ग्रीष्मकालीन शिबीराचा समारोप क्रीडा संकूलचे कार्याध्यक्ष तथा तहसीलदार आर .यु. सुरडकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला,यावेळी आमदार राजेश एकडे यांचे विशेष प्रयत्नातून येथील बॅडमिंटन कोर्टचे नुतनीकरणाचा उद्घाटन कार्यक्रम देखील संपन्न झाला,याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी तसेच बॅडमिंटन संघटनेचे सचिव विजय पळसकर ,तालुका संयोजक दिनेश राठोड,समाधान ईंगळे,राहुल तायडे  रेल्वे पी.आय.बाबुलाल चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थीती लाभली.

या कार्यक्रमाचे निमीत्ताने क्रीडा संकूलमधे नियमीत सराव करणारे खेळाडू कु स्वाती गावंडे हिची पोलीस भरतीत तर कु नेहा राऊत हिची सी आय एस एफ मधे निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे क्रिकेट खेळाडू कु श्रध्दा गायकवाड हिने दहावीचे परिक्षेत 94.80 टक्के गुण मिळविल्याबद्दल आणि कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर साॅफ्टटेनिस शालेय स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल स्पर्श तायडे ,सार्थक जोगदंड,मयंक पळसकर,कार्तिक कुदळे,स्रुष्टी होले,विनीता खेडद,भक्ती साळुंके,देवश्री जगताप,श्रावणी जोगदंड ,तनिष्क तायडे व पंजाब येथे संपन्न झालेल्या अखील भारतीय विद्यापिठ स्पर्धेत अमरावती विद्यापिठाचे नेत्रुत्व करणारा तालुका क्रीडा संकूलचा खेळाडू आदित्य भालशंकर ,प्रशिक्षक राम मेहसरे यांचा संकूल समितीच्या वतीने मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याठिकाणी ग्रीष्मकालीन शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा अधीकारी गणेश जाधव व राज्य  क्रीडा मार्गदर्शक अनिल ईंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व जिल्हा साॅफ्ट टेनिस असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

शिबीरातील खेळाडूंना क्रिकेट,साॅफ्टबाॅल,साॅफ्टटेनिस, मैदानीखेळ ,वेटलिफ्टींग याबाबत प्रशिक्षण क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके,राजेश्वर खंगार व रुपेश रोकडे यांनी दिले.या कार्यक्रमाचे आयोजनसाठी छत्रपती शिवाजी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके,संदीप जगदाळे,अमोल तायडे,नईमखान,दिपक ईंगळे,समीर शेख ,ओम गायकवाड, राम दाभाडकर ,जय गाढे व अथर्व सराफ यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment