शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा रेंगाळलेला प्रश्न प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा -भाई अशांत वानखेडे
मलकापूर (प्रतिनिधी)-
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता तसेच मलकापूर परिसरातील शैक्षणिक स्थिती लक्षात घेता प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (P.M.J.V.K.) या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत मलकापूर शहरामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपुर्वी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मंजुरात देण्यात आलेली आहे. या शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मंजुरात दिल्यानंतरही कुठल्याही प्रशासकीय स्तरावर हालचाली होत नसल्याने एकप्रकारे शासन, प्रशासनाची उदासिनता यामधून दिसून येत आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा रेंगाळलेला प्रश्न शासन, प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितास्तव जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्फत ६ जून रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (P.M.J.V.K.) या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत मलकापूर शहरामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपुर्वी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मंजुरात देण्यात आलेली आहे. मात्र स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या वतीने या महाविद्यालयाच्या ईमारत निर्मिती व अन्य बाबी संबंधात गेल्या दीड ते दोन वर्षात कुठलीही ठोस अशी पाउले उचलण्यात आली नाही. दरम्यान महाविद्यालयाच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या दालनामध्ये एका बैठकांचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी खामगाव शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य व संबंधितांनी जागेच्या उपलब्धतेबाबत मांडलेल्या मुद्द्यावरून उपविभागीय अधिकारी मलकापूर व तहसीलदार मलकापूर यांनी तालुक्यातील कुंड रस्त्यावरील गट क्र.४७५ मधील शासकीय जमीन उपलब्धतेबाबत अहवाल सादर केलेला आहे. जागेच्या मोजणीबाबत भूमिअभिलेख कार्यालय यांच्या सोबत पत्रव्यवहार केला असता भूमिअभिलेख कार्यालयाने मोजणी शुल्काबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शासकीय जमीन असल्याने कुठलाही मोजणीकरीता भरणा न करण्याबाबतचे मा.जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना एका पत्राद्वारे कळविले सुध्दा आहे. तरीही आजपर्यंतही या महाविद्यालयाच्या निर्मितीमध्ये कोठे माशी शिंकली हे न समजणारे कोडे ठरत आहे.
मलकापूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा व शैक्षणिक मागासलेपण विचारात घेतले असता अल्पसंख्यांक विभागाकडून शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाल मंजूर होणे ही एक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भूषणावह बाब असून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दालन उपलब्धतेची आशा पल्लवीत झाली आहे. या शैक्षणिक दालनाच्या निर्मितीमध्ये अंदाजे १३ ते १५ एकर जमिनीची उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे प्रशासकीय स्तरावरून सांगण्यात आलेले आहे, त्याअनुषंगाने जमिनीची उपलब्धता मलकापूर शहराला लागून प्रशासकीय स्तरावर करण्यात सुध्दा आलेली आहे. या नियोजित शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मुख्य शैक्षणिक इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृहे, खेळासाठी मैदान, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने, उपहार गृह, वाहनतळे आदींचा समावेश गृहीत धरण्यात आलेला आहे. शासनाच्या वतीने या शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मंजुरात देऊन तब्बल दीड ते दोन वर्षाचा कालावधी उलटला असून जागेची उपलब्धतेचा प्रश्न अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात मार्गी लागेलेला नसल्याने महाविद्यालयाच्या निर्मितीचा रेंगाळत चाललेला प्रकार हा सदर महाविद्यालय इतरत्र कोठेतरी वळविण्याचा उद्देश तर शासकीय, प्रशासकीय स्तरावर सुरू नाही ना ? असा प्रश्न यावेळी भाई अशांत वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.
मलकापूर शहर व तालुक्याला राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर असून मलकापूर तालुक्या बरोबरच बुलढाणा जिल्हा व इतर जिल्ह्यातीलही विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय निर्माण झाल्यास एक शैक्षणिक पर्वणीच ठरू शकेल. परंतु मंजुरातीनंतरही हे महाविद्यालयाच्या निर्मितीकरीता शासन, प्रशासन स्तरावर उदासिनताच दिसून येत आहे. तरी शासनाच्या वतीने मंजूर झालेल्या शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या निर्मितीचा हा रेंगाळलेला प्रश्न शासन, प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, याची सर्वस्व जबाबदारी ही शासन व प्रशासनाची राहील असे निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर रंजीतसिंग कपूर, दिलीप इंगळे, शेख इमरान शेख लुकमान, राजेंद्र पवार, विशाल मधवानी, अनिल आहुजा, सैय्यक अकबर, शेख जमील, विजय खानचंदानी, शेख राजीक, अमरलाल शर्मा आदीच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment