सहा तासांच्या भारनियमनाला जाफ्राबादकर वैतागले...!विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
जाफ्राबाद प्रतिनिधी : जाफराबाद शहरासह परिसरात गत दोन महिन्यांपासून पहाटे पाच वाजेपासून अकरा वाजेपर्यंत महावितरणने तब्बल सहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. सध्या दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांना विजेअभावी अभ्यासात व्यत्यय येत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय सर्वसामान्यांचीही वीज गायब असल्याने मोठे गैरसोय होत आहे. सहा तासांच्या भारनियमानाने पालक चिंतेत असून विद्यार्थ्यांचीही चिडचिड होत आहे. शेतीची कामेही खोळंबत आहे.
कोरोनामुळे अगोदरच दोन वर्ष शिक्षणाची वाट लागलेली असून नुकतेच कसेतरी शाळा पूर्वपदावर येत आहे. मात्र आता भारनियमनाने घाट घातला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा प्रचंड तणाव येत असून ऐन परीक्षेच्या तोंडावर भार नियमन केले जात असल्याने अभ्यास अपूर्ण राहत असल्याची खंत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच सध्या शेतीत कापूस वेचणी गहू, हरबरा, पिकांची मशागत सुरु असून, पिके ओलविण्याचे काम सुरु असल्याने सकाळच्या आठ वाजताच मजूर कामासाठी शेतावर जातात. मात्र या भारनियमनामुळे महिला मजुरांना सकाळी तीनला उठून स्वयंपाक करून पहाटेच शेतात पळावे लागत आहे. सकाळी पाच वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत सहा तासांचे भारनियमन होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी पहाटेच शेतात जावे लागत आहे.
पहाटे थंडीत उठून स्वयंपाक आंघोळीसाठी पाणी गरम करणे यासह विजेवर चालणारे सर्व कामे आटपून घ्यावे लागतात. त्यामुळे महिलांची झोपही पूर्ण होत नाही भारनीय मनामुळे विजेवर चालणारे इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिशनचे व्यवसायही सकाळी अकरा वाजेपर्यंत ठप्प असतात. त्यामुळे हे व्यावसायिक सकाळी अकरा नंतर आपली दुकाने उघडत असून, हातावर पोट असणाऱ्या लहान मोठ्या व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. महावितरणने सहा तासांचे भारनियमन बंद करा अथवा त्याचा वेळ बदलावा अशी मागणीही सर्व नागरिकांकडून केली जात आहे.
No comments:
Post a Comment