जिल्ह्यात 17 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध ; 353 सदस्यांचाही विजय



जाफ्राबाद / जालना : जिल्ह्यातील 266 पैकी 17 ग्रामपंचायतीचे सरपंच, तर 353 सदस्य बिनविरोध निवडून आले असून आता येणाऱ्या 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाला सरपंच पदासाठी 749 तर सदस्यत्वासाठी  4321 अशा एकूण 5 हजार 70 उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान सात व आठ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत असल्यामुळे 2 हजार 223 जणांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एक व दोन डिसेंबर पर्यंत सरपंच पदासाठी 1406, तर सदस्यत्वासाठी 6331 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. यात ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे भरताना अडचणी येत असल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष त्या त्या तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी दोन डिसेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास मुभा देत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मुदत मिळाली. यामुळे इच्छुकांचा आकडा वाढत गेला व 7यामुळे इच्छुकांचा आकडा वाढत गेला व 7717 जणांनी अर्ज भरले. यातून सोमवारी 5 डिसेंबर झालेल्या  अर्ज छाननीत 54 अर्ज बाद झाले. पुढे बुधवार व गुरुवार दोन दिवस  नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत होती. यावेळी काही पॅनल प्रमुखांनी अर्ज कायम ठेवण्यासाठी तर काहींनी माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली व याचे फलित म्हणून 2223 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

No comments:

Post a Comment