राज्यपालांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; नितीन गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत, प्रसंगी त्यांना राजकीय आणि सामाजिक रोषाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा राज्यपालांच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत केल्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहे. संभाजी ब्रिगेडने याप्रकरणी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६२ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डी. लिट या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्त बोलताना राज्यपाल महोदय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविषयी स्तुतीपूर्ण वक्तव्य करत असताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी नितीन गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करून टाकली.यावेळी राज्यपाल म्हणाले, “जेव्हा आम्ही लहान होतो आणि शाळेत जायचो तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचे आवडते नेते कोण आहे, तेव्हा कुणी महात्मा गांधी, कुणी सुभाषचंद्र बोस तर कुणी नेहरू असे सांगायचे. मला असे वाटते जर कुणी तुम्हाला विचारले तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहे, तर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
महाराष्ट्र हा रत्नांची खान आहे, पूर्वीच्या काळातील आदर्श शिवाजी महाराज आहे. परंतू जर नव्या काळातील आदर्श शोधायचे झाल्यास डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरी तुम्हाला इथेच मिळतील.ज्यपाल कोश्यारींच्या या विधानानंतर सध्या त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठत असून, संभाजीराजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात निषेध नोंदविला आहे. पंतप्रधानांना राज्यपालांची राज्यातून उचलबांगडी करण्यासाठी आपण विनंती करणार असल्याचे भाष्य यावेळी संभाजीराजे यांनी केले. एकंदरीतच राज्यपालांनी शिवाजी महाराजांची नितीन गडकरी यांच्यासोबत तुलना केल्याने त्यांच्या आधीच्या वादग्रस्त विधानाचा दाखला देत निषेध नोंदविण्याचे सत्र सुरु झाले आहे.
No comments:
Post a Comment