पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर-आ. राजेश एकडे


 हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन  आमदार राजेश एकडे  यांच्या हस्ते थाटात संपन्न 



    नांदुरा 22/11/22 नांदुरा येथील हिंदी मराठी पत्रकार कार्यालयाचे उद्घाटन ताटात संपन्न करण्यात आले आहे. त्यावेळी उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदुरा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी पत्रकारांसोबत आहे .

 नांदुरा येथील  पोलीस स्टेशन रोड वेंकटेश कॉम्प्लेक्स नांदुरा येथील हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन  करीत अभिवादन करण्यात आले त्यावेळी विचार मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष  आमदार राजेश एकडे, नायब तहसीलदार गिरी, अहिल्या राज संपादिका धनश्रीताई काटीकर पाटील, उल्हासभाई शेगोकार, नथुजी हिवराळे, उपस्थित होते.

 तर यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयास उद्घाटन प्रसंगी विजय डवंगे, भाऊसाहेब बावणे संपादक विदर्भ मतदार, शैलेश वाकोडे दैनिक सत्य प्रतिमा संपादक, मुकुंदराव चोपडे संपादक अभिनव नांदुरा, आदी मान्यवरांनी उद्घाटनपर शुभेच्छा दिल्या त्यावेळी विदर्भ सचिव सतीश दांडगे, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, देवेंद्र जयस्वाल, प्रा. प्रकाश थाटे, सय्यद ताहेर, विनायक तळेकर, श्रीकृष्ण भगत, शेख जमील, विजय वसत्कार ,तुकाराम रोकडे, प्रमोद हिवराळे , आदी मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment