जिजाऊ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
दर्पण प्रतिनिधी / आकाश बकाल
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत जिजाऊ कला व विज्ञान महाविद्यालय वरुड बु. ता. जाफराबाद जिल्हा जालना येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय पवार सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.लोखंडे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जी.आर गोफणे सर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख यांनी केले. मनोगत व्यक्त करताना डॉ.पवार सर म्हणाले की संविधान दिन हा साजरा करण्यास नव्हे तर नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी समाजामध्ये राबवण्यात यावा असा दिवस आहे.
29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान दिनाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकावर चर्चा नंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते यावेळी अनेक मान्यवर प्राध्यापक,शिक्षक व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.लोखंडे सर यांनी केला व आभार प्रा.कृष्णा दिवटे सर यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment