पर्यटन स्थलसाठी प्रिय शिंदे यांची उप वनरक्षक यांच्याशी चर्चा....
प्रतिनिधी स्वरूप सूरोशे
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या आर्णी तालुक्यातील असलेल्या दत्तरामपुर जवळ बाबा पेंटर यांचे देवस्थान असून देवस्थाना लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत पर्यटन स्थळ बनून देण्यासाठी संबंधित विभागाला पाठपुरावा करण्यासाठी दर्गाह ट्रस्ट च्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शिंदे यांनी निवेदन दिले होते. निवेदनाची दाखल घेत प्रिय तोडसाम यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेऊन निवेदनातून मागणी केली आणि वन मंत्र्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोका पाहणी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.
प्रिया शिंदे यांनी दिनांक 22 नोव्हेंबर या रोजी उप वन रक्षक आनंद रेड्डी यांची यवतमाळ येथील कार्यालयात भेट घेऊन पर्यटन स्थळ व्हावे यासाठी पाऊल उचलावे अशी विनंती केली आणि निवेदन दिले. यावेळी उप वन रक्षक आर्णी उत्तर चे आर एफ ओ रुपेश रोडगे यांना बोलावून माहिती घेण्यात आली. व लवकरात लवकर आनंद रेड्डी यांनी मी स्वतः मोका पाहणी करणार असे सांगितले.
No comments:
Post a Comment