खासगाव येथे गुरुचरित्र पारायण व गायत्री याग सप्ताहाचे आयोजन





दर्पण प्रतिनिधी / आकाश बकाल

    जाफ्राबाद : तालुक्यातील खासगाव येथे परमपूज्य मोरेदादा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास मार्ग केंद्र दिंडोरी, जिल्हा नाशिक व गुरुवर्य हभप भगीरथ महाराज मठाधिपती पळसखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र दत्त मंदिर खासगाव येथे भगवान दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण व गायत्री याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आयोजन एक डिसेंबर रोजी प्रारंभ होत असून आठ डिसेंबरला या सप्ताहाची सांगता होणार आहे. 

    या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रवचन सेवा राहणार असून गुरुवर्य श्री बोटुळे गुरुजी खासगाव हे मार्गदर्शक करणार असून, या सप्ताहा चा  महाप्रसादाचा कार्यक्रम हा आठ डिसेंबर  गुरुवार रोजी दुपारी 11 ते 4  या वेळेत होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment