भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने उतरवला तगडा संघ; शाकिब अल हसनची झाली एन्ट्री*
दर्पण प्रतिनिधी : क्रीडा विशेष बातमी
नवी दिल्ली : भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे. 4 डिसेंबरपासून वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी शाकिब अल हसनचे बांगलादेशच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तो जुलै-ऑगस्टनंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळत आहे. यासिर अलीला देखील संघात स्थान मिळाले आहे. तर झिम्बाब्वेमधील तिसऱ्या वनडे सामन्यात पदार्पण करणारा तेजस्वी इबाडोट हुसैन यालाही संधी मिळाली आहे.
Labels:
महाराष्ट्र
No comments:
Post a Comment