सिद्धार्थ महाविद्यालयाच्या खेळाडूंचा स्पर्धेत डंका



दर्पण प्रतिनिधी जाफ्राबाद :

जाफ्राबाद : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जालना तथा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे, कॅरम, बॉक्सिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी यश संपादन केले. याबरोबर त्यांची जिल्हा व विभाग स्तरावर निवड करण्यात आली आहे.

कराटे स्पर्धेत अक्षय दाभाडे, जाकेर सय्यद, खरसन रितेश यांनी यश संपादन केले. कॅरम मध्ये कार्तिक पठाडे, इशिका मेठी, बॉक्सिंग मध्ये गोपाल बनसोडे यांनी यश संपादन केले त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. जिल्हास्तरावर हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ, फुटबॉल, मुली क्रिकेट, खो-खो आदि खेळामध्ये खेळाडूंची निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब मस्के, सचिव प्रा. राहुल म्हस्के, प्राचार्य डॉ श्याम सर्जे, उपप्राचार्य डॉ सुनील मेढे, उपप्राचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यासागर, रेखा परदेशी, मोहम्मद शेख यांच्यासह प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment