खळबळजनक: 'त्या' प्रेमी युगुलाची कहाणी संपली; खोट्या प्रतिष्ठेपोटी प्रेमाचा करुण अंत!
वाचकांचा उदंड प्रतिसाद आणि आग्रही मागणीस्तव विशेष भाग!
'खोट्या प्रतिष्ठेची भिंत आणि प्रेमाची गळचेपी' या काल्पनिक कथेला रसिक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद! पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, "या कथेतील पुढील घडामोडी आणि शेवट काय झाला?" हे जाणून घेण्यासाठी वाचकवर्गाकडून सातत्याने मागणी (फर्माईश) येत होती. रसिक प्रेक्षकांच्या याच आग्रहास्तव आणि मागणीचा आदर करून हा पुढील भाग प्रसिद्ध करत आहोत.
प्रियकराचा सक्तीचा त्याग, मुलीवर अमानुष दबाव आणि प्रशासनाची संशयास्पद शांतता!
चिखली (प्रतिनिधी):
खेड्या गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीने शिवाजीनगर येथे जाऊन आपल्या पसंतीच्या तरुणासोबत 'कोर्ट मॅरेज' केले होते. मात्र, या प्रेम विवाहाला मुलीच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. त्यांनी मुलीला दोन महिन्यांपासून घरात बेकायदेशीरपणे कोंडून ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर सोडचिट्टी (घटस्फोट) घेण्यासाठी सतत मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जात होता. आपल्या प्रियेशीला होणारा हा अमानुष त्रास पाहून प्रियकराने अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या प्रेमाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि सोडचिट्टीवर अनुमती दिली.
"जर माझ्या प्रेमामुळे माझ्या प्रियेशीला इतका त्रास होत असेल, तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करणार," असे प्रियकराने सांगितले. या सक्तीच्या ताटातुटीनंतर कौटुंबिक दबावामुळे प्रियकर नवीन साथीदाराच्या बंधनात अडकला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रियकराने तीव्र संताप व्यक्त केला आहे. "दोन प्रेमी युगुलांची ताटातूट करणारे कधीच सुखी होणार नाहीत. दोन जीवांची ताटातूट करणारे कसली प्रतिष्ठा दाखवणार?" असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
या कहाणीचा अंत असा भयानक होईल, याची कल्पना कुणीही केली नव्हती. प्रतिष्ठित कुटुंबाने आपल्या खोट्या प्रतिष्ठेपोटी एका प्रेमी युगुलाच्या स्वप्नांचा अंत केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासन पूर्णपणे उदासीन राहिले. प्रतिष्ठित लोकांच्या दबावाखाली सामान्य जनतेचा आवाज दडपला जात आहे. त्यामुळे "हीच का तथाकथित प्रतिष्ठित कुटुंबांची प्रतिष्ठा?" असा रोखठोक सवाल आज सामान्य जनता विचारत आहे.

No comments:
Post a Comment