महागाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी, महागाव येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बँक परिसरात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगताना उपस्थित मान्यवरांनी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमास बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी बँक परिसर दुमदुमून गेला. उपस्थित बांधव शाखा व्यवस्थापक . घुगे साहेब रोखपाल धनंजय मस्के साहेब . (बाबू साहेब अजय राठोड. रोहित फाळके .अक्षय डोंगरे )गावातील नागरिक नरवाडे पाटील व विशाल रणखांब व सहाय्यक कर्मचारी विपुल इंगळे मान्यवर उपस्थित होत.

No comments:
Post a Comment