न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, म्हसळा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
(वैभव कळस )
विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा पेन व पुष्प देऊन सन्मान; गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, म्हसळा येथे गुरुपौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. पाटील, पर्यवेक्षक ई. सी. पाटील, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कामडी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करणारे प्रभावी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना पेन व पुष्प अर्पण करून त्यांचा सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महान कार्याविषयी मनोगते व्यक्त करत प्रेरणादायी भाषणे सादर केली.
प्राचार्य डी. आर. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, गुरु व शिष्य यांच्यातील पवित्र नाते तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुंचे असलेले अनन्यसाधारण स्थान यावर मोलाचे विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी गुरुंप्रती कृतज्ञता बाळगून त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन घडविण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ई. सी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सांस्कृतिक विभागाचे त्यांनी विशेष आभार मानले.
गुरुंप्रती आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

No comments:
Post a Comment