"सात जन्माचा नाजूक धागा गुंफत म्हसळा तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

  


(वैभव कळस)

सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हसळा तालुक्यात सर्वत्र वटपौर्णिमा उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. सात जन्मी हाच नवरा मिळावा आणि जन्मोजन्मीचे नाते अतूट रहावे म्हणून वडाच्या झाडाला धाग्याने गुंफून आणि पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवून परमेश्वराला हे नाते अतूट आणि दृढ व्हावे अशी प्रार्थना सर्व स्त्रिया करीत होत्या.

वडाची पुजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते अशी धारणा असल्याने लाखो महिला वडाच्या  झाडाची पुजा करतात. सोमवारी  वटपौर्णिमानिमित्त ठिकठिकाणी सौभाग्य वती महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत ठेवून विधीनुसार वडाच्या झाडाची पूजा करत जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी पार्थना देखील केली.


No comments:

Post a Comment