'म्हसळा कुणबी समाजाची सामाजिक चळवळ ही नेहमी सर्वांच्या हिताची असते' - महेंद्र टिंगरे
(वैभव कळस )
म्हसळा तालुका कुणबी समाज मुंबई चिखलप विभाग यांनी समाजाच्या उन्नतीसाठी तसेच एक संघाने कार्यरत राहो एक जूटी निर्माण करून समाजात उन्नती व्हावी यासाठी म्हसळा तालुका कुणबी समाज चिखलप विभाग यांनी विविध विषयांवरती रसिकांची जुगलबंदी अशा स्वरूपाचा कार्यक्रम ठेवून मुंबईसारख्या ठिकाणी तरुणांना उद्योजकांना विद्यार्थी विद्यार्थी जणांना एकत्र आणून सध्या जगात काय घटना घडतात याबाबत सत्य काय आहे ते शक्ती तुरा या नाचाच्या सामना ठेवून सध्याच्या स्थितीमध्ये जे सुरू आहे त्याबाबत कवी शाहीर उमेश पोटले व शाहीर प्रशांत खांदारे त्यांनी आपले गीताच्या बोलातून सरकारला दाखवून दिले आणि गणेशाला सांगून दिले सध्या राज्य देश म्हणजे फुटीचा काळा बाजार आहे .
कारण डॉक्टरच्या पवित्र कार्यात काम करणारे कर्तबगार विद्यार्थी घडावेत यासाठी मायबाप सरकारने नीट परीक्षा ठेवून पात्र विद्यार्थ्यांना डॉक्टर पेशामध्ये अथवा अन्य क्षेत्रामध्ये आणण्याचे काम करत असताना वाईट बुद्धीचे लोक एकत्र येऊन निष्पाप विद्यार्थ्यांचा बली घेण्याचे काम सुरू असल्याचे या गीतातून संपूर्ण रंगमंचाला रोमांचक केले.
एकीकडे श्रीकृष्ण आणि राधा तर आजच्या जगात प्रेम करून लग्न करणार नाही असं मनात ठेवून कड्यावरून लोटून देणारी आजची राधा ही निरपराध कृष्णाचे जीव घेणारे बुद्धी सुचत असेल तर आताच्या कलियुगात श्रीकृष्ण म्हणून भगवंताने या धर्तीवर ती यावे बुद्धीचा दाता श्री गणेश यांनी सर्वांची बुद्धी बदलावी या मापक याचना कवी शाहीर यांनी भगवंताकडे गाराने गायले तसेचया कार्यक्रमातून महिला पुरुष अबला विद्यार्थी उद्योजक तिथेच असे सर्व असे सर्व एकत्र येऊन समाजाची एकजूट काय हे दाखवण्यात आली हा कार्यक्रम मास्टर दिनानाथ मंगेशकर त्या सभागृहात संपन्न केला.
त्यासाठी म्हसळा कुणबी समाज खिखलप विभाग कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कुणबी समाज चिखलप ग्रामीण अध्यक्ष लहुजी तुरे चिखलप विभागीय अध्यक्ष मुंबई दत्ताराम बोर्ले यांच्या नेतृत्वाखाली आणि म्हसळा तालुका विद्यमान अध्यक्ष महेंद्रजी टिंगरे ,सहचिटणीस अनिलजी काप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय कमिटीच्या सहकार्याने शक्तीतुरा हा कार्यक्रम दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई या ठिकाणी संपन्न झाला .
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कुणबी समाज शाखा म्हसळा मुख्य कमिटी, ग्रामीण कमिटी, महिला मंडळ, देणगीदार, विभागीय कमिटी, विभागीय गाव अध्यक्ष व सचिव तसेच समाज बांधव उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सुञ-संचालन तालुका सहचिटणीस अनिल काप यांनी करून व ग्रामीण कुणबी समाज चिखलप विभाग अध्यक्ष लहुजी तुरे मुंबई तालुका सरचिटणीस राजू धाडवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले चिखलप विभागा तर्फे सुभाष गोविंद कदम यांनी समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एकीकडे श्रीकृष्ण आणि राधा तर आजच्या जगात प्रेम करून लग्न करणार नाही असं मनात ठेवून कड्यावरून लोटून देणारी आजची राधा ही निरपराध कृष्णाचे जीव घेणारे बुद्धी सुचत असेल तर आताच्या कलियुगात श्रीकृष्ण म्हणून भगवंताने या धर्तीवर ती यावे बुद्धीचा दाता गणेश यांनी सर्वांची बुद्धी बदलावी या मापक याचना कवी शाहीर यांनी भगवंताकडे गाराने गायले

No comments:
Post a Comment