टेंभुर्णी येथे श्री जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव आनंदाने साजरा.
हरे कृष्णाच्या गजर ने भक्तिमय वातावरण मध्ये रमले टेंभुर्णीकर.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
प्रतिवर्षी नुसार या वर्षी ही टेंभुर्णी येथील इस्कॉन सेंटर च्या वतीने देशातील सर्वात मोठ्या उत्सवात सामील होण्याचे समाधान मानून येथे ही जगन्नाथ यात्रेचा रथ ओढून जय जगन्नाथ चा जय घोष करत, 'हरे रामा हरे कृष्णा' च्या अमृतमय बोली ने सगळे टेंभुर्णी शहर दुमदुमले.
टेंभुर्णी येथील शिवाजी नगर हून सुरू झालेल्या या रथ यात्रेत बघता बघता मोठी गर्दी झाली होती. शिवाजी नगर,आंबेगाव रोड, मुख्य बस स्थानक ,मारवाडी गल्ली, जिरीमाळी गल्ली, राम मंदिर ,सावता चौक , ते टेंभुर्णी येथील सावता मंगल कार्यालयात ही रथ यात्रा दाखल झाली. चीदुपारी एक वाजता निघालेली रथ यात्रा ही संध्याकाळी सात वाजेला येथे खेळत खेळत दाखल झाली होती. याठिकाणी नंतर पूजा करून, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विशेष महोत्सव प्रवचन दाऊजी प्रभु ,रास गोविंददास प्रभु चे आध्यात्मिक प्रवचन या वेळी पार पडले. टेंभुर्णी येथील जगन्नाथ भक्त गणेश प्रभु खांडेभराड , माताजी लताबाई खांडेभराड, यांनी गेल्या १० वर्षापासून टेंभुर्णी इस्कॉन सेंटरच्या माध्यमातून या जगन्नाथ प्रभुच्या रथयात्रा उत्सवाला सुरवात केली होती.
त्यांच्या या प्रणेतुन आज पुर्ण टेंभुर्णी शहर जगन्नाथ प्रभुची आराधना करतात. आज येथे इस्कॉन सेंटरच्या माध्यमातून दररोजच्या किर्तन सेवा घेऊन नामस्मरण केले जात आहे. दरवर्षी होणाऱ्या रथयात्रा उत्सवात टेंभुर्णी पंचक्रोशीतील जगन्नाथ भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन, या सर्व रथ यात्रेत इस्कॉन सेंटर चे सर्व भाविक भक्त महिला पुरुष बाळ गोपाळ मोठ्या संख्येने सामील झाले होते.

No comments:
Post a Comment