कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजाननभाऊ ठाकरे यांचा गौरवशाली सेवाप्रवास संपन्न
प्रतिनिधी गजानन चव्हाण
अकोला जिल्हा पोलीस दलातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि निष्कलंक सेवेमुळे जनमानसात वेगळी ओळख निर्माण करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजाननभाऊ ठाकरे हे 30/06/2026 रोजी प्रदीर्घ व गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
जामठी बु. ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथील रहीवाशी दि. ०१ जुलै १९९४ रोजी पोलीस दलात भरती झालेल्या गजाननभाऊ ठाकरे यांनी आपल्या तब्बल 32 वर्ष म्हणजे तीन दशकांच्या सेवाकाळात मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, पिंजर, सिव्हिल लाईन (अकोला) आणि डाबकी रोड (अकोला) या विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावत उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवली. सेवेच्या अखेरीस ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मूर्तिजापूर येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणारे, शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे गजाननभाऊ यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध, नागरिकांशी आदरपूर्वक संवाद आणि संकटसमयी योग्य मार्गदर्शन ही त्यांची खास ओळख राहिली. त्यांनी केवळ पोलीस वर्दी परिधान केली नाही, तर त्या वर्दीचा सन्मान आपल्या प्रत्येक कृतीतून जपला.
समाजसेवा, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांप्रती संवेदनशीलता या गुणांमुळे त्यांनी सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमचे आदराचे स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढीतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
दि. 30/06/2026 रोजी अधीक्षक कार्यालय अकोला येथे अर्चितजी चांडक सर पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्यांचा मुलगा व पत्नी समवेत सत्कार केला,सेवानिवृत्तीच्या या भावनिक क्षणी सहकारी, मित्रपरिवार व नागरिकांनी गजाननभाऊ ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.
"कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सुंदर संगम असलेले गजाननभाऊ ठाकरे यांना त्यांच्या गौरवशाली सेवेस मानाचा मुजरा आणि सेवानिवृत्तीनंतरच्या आनंदी, निरोगी व समृद्ध जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!"

No comments:
Post a Comment