नाईक-अंतुले महाविद्यालयात स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
(वैभव कळस)
कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, सचिव अशोक तळवटकर, खजिनदार वंदना विचारे, विश्वस्त सचिव प्रतिनिधी फजल हळदे,सदस्य महादेव पाटील, सदस्या नीलम वेटकोळी आणि सर्व कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे विश्वस्त सचिव प्रतिनिधी फझल हळदे,सदस्य महादेव पाटील,समाजसेवक साजिद इनामदार, डॉ.मुश्ताक मुकादम,जिल्हा संघटक रा.कॉं.पार्टी.शाहीद उकये, विद्यार्थी संघटना अध्यक्ष म्हसळा तालुका शाहनवाज उकये, इस्माईल डोंदिलकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आर.एस.माशाळे ,एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. हालोर राजेंद्र व प्रा. बढे मयूर यांनी केले व सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment