मुर्तिजापूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध देशी दारूसह आरोपी ताब्यात, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधातील मोहिमेला आणखी एक यश मिळवत देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत देशी दारूचा साठा आणि स्कुटीसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने माना मार्गावरील नवीन घरकुल परिसरात बुधवारी (९ जुलै) सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता सापळा रचला. संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडे २५० देशी दारूच्या बाटल्या (किंमत सुमारे १० हजार रुपये) आढळून आल्या. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ३० हजार रुपये किमतीची स्कुटी जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी रवी हिमतराव वाघमारे (वय ३५, रा. माना) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु वानखेडे व पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा यांनी यशस्वीपणे पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु वानखेडे करीत आहेत.
अवैध दारूविक्री व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

No comments:
Post a Comment