अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ : गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात संपन्न

 


पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी 

          दि. १७ जुलै : अक्षरभारती प्रतिष्ठान, सांगली संचलित अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ चा भव्य बक्षीस वितरण समारंभ के. वॉरियर्स नाथ पें सभागृह, पंचायत समिती पोलादपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.समारंभात राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व केंद्रस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल पालक व शिक्षकांचाही सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

यावेळी मा. शिक्षण सभापती श्री. चंद्रकांतजी कळंबे* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण अभ्यास, वाचन संस्कृती आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. "स्पर्धा परीक्षा या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रभावी व्यासपीठ असून, जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो," असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाला मा. डॉ. निलेश कुंभार साहेब (जिल्हा परिषद सदस्य),मा. अविनाश शिंदे साहेब (सभापती, पंचायत समिती पोलादपूर), मा.सौ अनिता भिलारे मॅडम (उपसभापती), गटविकास अधिकारी मा.श्रीम दीप्ती गाट मॅडम , गट शिक्षण अधिकारी मा श्री विजय काणेकर साहेब , विस्तार अधिकारी मा श्री गणेश भगत साहेब , मा श्री सुधीर सकपाळ साहेब* शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. सुधीर भास्कर सकपाळ साहेब यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.हा सोहळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा आणि शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

No comments:

Post a Comment