दैनिक.जगाचा जगमित्र संपादक संतोष भुतेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेध.



 टेंभूर्णी पोलिस ठाण्यात पत्रकार संघाच्या वतीने हल्लेखोरावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. 


टेंभुर्णी(जालना) प्रतिनिधी विष्णु मगर

दैनिक ‘जगाचा जगमित्र’चे संपादक संतोष भुतेकर यांच्यावर गुटखा माफियांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी.  

सदरील निवेदनात म्हटले आहे की, “अवैध धंदे करणारे गुटखा माफिया बातम्या छापल्या म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ले करत असतील तर हे गंभीर आहे. अशा गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देऊन, टेंभुर्णी पत्रकार , रावसाहेब अंभोरे, पी. जी. तांबेकर, नसीम शेख, सुनील भाले, संजय राऊत, गजानन देठे, बी. डी. सवडे, अलकेश सोमाणी, बालाजी शेवाळे, साबेर शेख, फकरू कुरेशी, गजानन शेळके, सुनील जोशी, आशपाक शेख, आशिष पैठणे  शेख इंभ्रान शेख गफुर शेख असद  भिकन खाँ पठाण आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांवर होणारे हल्ले हा लोकशाहीवरचाच हल्ला असून पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या माफियांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

No comments:

Post a Comment