कळमनुरी पो स्टे निरीक्षक पदी जमीर नाईक यांची नियुक्ती
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी : पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांची बदली हिंगोली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जमीर अब्दुल गणी नाईक यांची नेमणूक करण्यात आली. हिंगोली जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनंतर प्रशासकीय कारणावरून मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले असून या अंतर्गत पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांची बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे जमीर अब्दुल गणी नाईक यांना कळमनुरी पोलिस निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षकपदी उमाकांत वैजनाथ यांचीही नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पोलिस निरीक्षक जमीर नाईक पदभार हाती घेणार असून कळमनुरी ठाण्यांतर्गत अवैध धंदे, अवैध दारू विक्री तसेच बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्थेला नियंत्रण करीत कायदा, सुव्यवस्था अबधित राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

No comments:
Post a Comment