पी.एम किसान लाभार्थ्यांनी दि ३० जून पूर्वी ई के.वाय सी पूर्ण करावी

 



 पुढील हप्ता मिळण्यासाठी प्रमाणीकरण अनिवार्य -  तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार

प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम - किसान) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी दि ३० जून २०२६ पूर्वी वार्षिक ई - केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन निफाडचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे

      केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पीएम - किसान योजनेतील पारदर्शकता वाढविणे तसेच केवळ पात्र आणि जिवंत लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी वेळेत प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    शेतकरी नजीकच्या सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने अथवा पीएम-किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात. तसेच ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी न केल्यास पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निफाड तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment