आंबेगाव परिसरात माऊंट एव्हरेस्ट स्कूल व यश करिअर अकॅडमीची द्वितीय शाखा सुरू
पुणे, दि. ६ जून : आंबेगाव परिसरातील नामांकित शैक्षणिक संस्था माऊंट एव्हरेस्ट स्कूल आणि यश करिअर अकॅडमी बाय डॉ. सुशांत शिंदे यांच्या द्वितीय शाखेचे उद्घाटन आज चिंतामणी चौक, शिवसृष्टी नजीक, हायवेपासून हाकेच्या अंतरावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या नवीन शाखेचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ. सुशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा शिंदे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली.
उद्घाटन समारंभास विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी डाळ, निकिता भोसले, स्वाती तिवाटणे, अमृता गोसावी, वृषाली तिखे, अनिता पवार आणि संगीता धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील पालक, विद्यार्थी व नागरिकांनी नव्या शाखेचे उत्स्फूर्त स्वागत केले.चिंतामणी चौक परिसरातील विद्यार्थ्यांना आता गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती तसेच शैक्षणिक मार्गदर्शन घराजवळ उपलब्ध होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बोलताना डॉ. सुशांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

No comments:
Post a Comment