श्रीमती जे.बी.के. विद्यालयाच्या दोन अग्नी विरांची निवड.



टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना) विष्णु मगर

टेंभूर्णी येथील नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती.जे. बी.के.विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयातील शंतनू भागवत गोरे, व तुषार ज्ञानेश्वर गोरे या दोन माजी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासातील मेहनत, कठोर शारीरिक परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यदलात अग्नी विर म्हणून नियुक्ती मिळवली आहे. हे दोन ही विद्यार्थी गोंधनखेडा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असुन, दोघांनी ही देश सेवेसाठी सैन्यदलात जाण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. त्यांचे स्वप्न साकार होत असतांना आई -वडील, व गावकरी यांचा आनंद ओसंडून वहात आहे,  हे गुणी, हुशार, प्रामाणिक विद्यार्थी कुठल्याही व्यसनाला बळी न पडता,त्यांनी शारीरिक कसरती वर जोर दिला. मोबाईलच्या फसव्या जाळ्यात न अडकता, अभ्यासाला महत्व दिले. दररोज सकाळी चार ते पाच किलोमीटर धावणे, शारीरिक कसरत करणे, आरोग्याच्या, आहाराच्या , चांगल्या सवयी बाळगणे. या जोरावर या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. आणि गावातील तरूणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

 त्यांच्या या निवडीचे, नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा, उपाध्यक्ष. जमिर शेख सर, सचिव. सत्यनारायण सोनी,जेष्ठ संचालक. मधुकर निकम, संचालक. सुभाषचंद्र राठी, प्रदिप काबरा, प्रदिप मुळे,संचालक. विष्णूभाऊ सांगुळे, प्रा.दत्ताराव देशमुख, शेषराव मुळे,भगवान डोईफोडे,मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक.भिवसन ससाणे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख. एस. बी. बोरकर, विष्णू जाधव, रमेश इंगळे, क्रिडविभाग प्रमुख. कैलास भुतेकर, राजेश शेवाळे, राजेंद्र जगताप, रविंद्र मोरे, समाधान कांबळे, दिनकर ऊखर्डे, दत्तात्रय ऊखर्डे, प्रा. सुनील बनसोडे, डॉ. अरूण आहेर, प्रा. रामदास भांगे, प्रा. कैलास जाधव, प्रा.जी.टी.धोटे, डॉ. आनंद जाधव, वासुदेव क्षिरसागर, उज्वला आवटी, मंजुषा भिलावेकर,माधुरी पाटील, एफ. ए. शेख, ज्योतीताई जाधव, विजया शिल्लार,कार्यालयीन प्रमुख. सुनिल सकुंडे, प्रयोगशाळा सहाय्यक. राजुभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दिपक देशमुख, विनोद देशमुख आदींनी, अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

No comments:

Post a Comment