मोर्विस ग्रामपंचायत येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.
पत्रकार:- मोहन जाधव.
चास नळी:- दिनांक ३१मे रोजी मोर्विस ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मोर्विस गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता पारखे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपसरपंच पंडित कोकाटे, सर्जेराव सोनवणे, गोरख कोकाटे, अशोक जाधव, योगेश सोनवणे,प्रभाकर सोनवणे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या न्यायप्रिय, लोककल्याणकारी व दूरदृष्टीपूर्ण कारभाराचे महत्त्व विषद केले. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत सदर वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी देवेंद्र वारुळे, जनार्दन पारखे, कैलास चांदगुडे, संतोष पगारे ,अशोक पारखे, राजेंद्र पारखे ,संतोष सरडे, हरिभाऊ सरडे, सुभाष पारखे, शिवराम कोकाटे तेजस पारखे, निखिल पारखे, सिद्धार्थ पगारे, साईनाथ सोनवणे, योगेश सोनवणे,मधुकर सोनवणे साहेबराव सोनवणे, सागर जाधव, अनिल साबळे आदी मान्यवरासह ग्रामस्थ, युवक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद वाघ यांनी केले.

No comments:
Post a Comment