वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुकाध्यक्ष पदी रविकुमार पंडित यांची निवड
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुका कार्यकारिणी काल वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे महासचिव यांनी जाहीर केली. तालुकाध्यक्ष पदी रविकुमार पंडित तर महासचिवपदी प्रज्ञानंद घोडके यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी यशवंत नरवाडे, काशिनाथ साळवे, किरण पाईकराव, सुभाष खाडे, सचिव पदी प्रवीण नरवाडे, देविदास नरवाडे, मुकिंदा ढेपे तर सदस्य पदी किरण मस्के, संदीप जाधव, आनंद अटकोरे, प्रशांत नरवाडे, मुजहीद शेख, विशाल पंडित यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्धल सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नूतन कार्यकारिणी ची निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
तालुकाध्यक्ष पदी निवड श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केली याबदल साहेबांचे आभार करत आहेत. "वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून, पक्षाच्या वरिष्ठ नेते जिल्हा समन्वयक मा ज्ञानेश्वर सुलताने सर व प्रा. सुरेश शिरसाठ सर यांनी माझ्यावर 'कळमनुरी तालुकाध्यक्ष' पदाची जी मोठी जबाबदारी सोपवली आहे, त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे आणि सर्व पदाधिकारी मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे असे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment