अभिनव सायन्स अकॅडमीची MHT-CET मध्ये दैदिप्यमान कामगिरी



राज्यभरात यशाचा झेंडा; 20 विद्यार्थ्यांना 99.5 पेक्षा अधिक पर्सेंटाइल

 पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी 

गडहिंग्लज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देत यशाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लज ने यंदाच्या MHT-CET 2026 परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करून राज्यभरात आपला ठसा उमटविला आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्कृष्ट पर्सेंटाइलमुळे गडहिंग्लजसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक नावलौकिक उंचावला आहे.

या परीक्षेत सानिका धनाजी इलगे हिने 99.99 पर्सेंटाइल मिळवत महाराष्ट्रातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले. तसेच वैभव वसंत पाटील याने 99.95 पर्सेंटाइल, अथर्व पाटील आणि मयुरी पाटील यांनी 99.94 पर्सेंटाइल, तर चिन्मय कुर्बेट्टी याने 99.91 पर्सेंटाइल गुण मिळवत संस्थेच्या यशात भर घातली.

याशिवाय 20 विद्यार्थ्यांनी 99.5 पेक्षा अधिक पर्सेंटाइल, 40 विद्यार्थ्यांनी 99 पेक्षा अधिक पर्सेंटाइल, 67 विद्यार्थ्यांनी 98 पेक्षा अधिक पर्सेंटाइल आणि तब्बल 160 विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवून अभिनवच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यंदा IIT मुंबई, IIT हैदराबाद, IIT गुवाहाटी, IIIT नागपूर तसेच NIT सिलचर आणि NIT गोवा यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून गडहिंग्लजच्या शैक्षणिक क्षमतेचा लौकिक देशभर पोहोचविला आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमोल पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित चाचण्या, वैयक्तिक समुपदेशन आणि स्पर्धात्मक वातावरण या वैशिष्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने उत्कृष्ट यश मिळत असल्याचे पालक व शिक्षणप्रेमींनी नमूद केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळविता येते, हे अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

No comments:

Post a Comment