MHT-CET मध्ये अभिनव सायन्स अकॅडमीची सुवर्णकामगिरी
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी
गडहिंग्लज: स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सातत्याने यशाचे नवे शिखर गाठणाऱ्या अभिनव सायन्स अकॅडमी, गडहिंग्लजने यंदाच्या MHT-CET 2026 परीक्षेत ऐतिहासिक यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. अकॅडमीची विद्यार्थिनी सानिका धनाजी इलगे हिने एस. ई. बी.सी. प्रवर्गातून ९९.९९ पर्सेंटाइल मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच अकॅडमीच्या ३१ विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळविले असून, १४८ विद्यार्थ्यांनी ९५ पेक्षा अधिक पर्सेंटाइल प्राप्त करून गुणवत्तेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सानिका इलगे हिच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण गडहिंग्लज परिसरासह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या मेहनतीला, जिद्दीला आणि अकॅडमीच्या दर्जेदार मार्गदर्शनाला मिळालेले हे सर्वोच्च यश मानले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अभिनव सायन्स अकॅडमीने गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांमधील उत्कृष्ट निकालांची आपली गौरवशाली परंपरा आणखी भक्कम केली आहे. या यशामागे संस्थेचे उच्चविद्याविभूषित संस्थापक अध्यक्ष डॉ. अमोल पाटील यांचे दूरदर्शी नेतृत्व, सचिव व मुख्य प्रशासक संतोष पाटील यांचे प्रभावी व्यवस्थापन, प्राचार्य अभिजित पाटील यांचे शैक्षणिक मार्गदर्शन, प्रा. हेमंत संकपाळ अकॅडेमिक
डायरेक्टर, समन्वयक प्रा. आदेश बन्ने, प्रा. बाबासो कांबळे, प्रा. प्रशांत कळके, प्रा. राऊतखेडे, प्रा. सोमेश जाधव, डॉ. तुकाराम वांद्रे, प्रा. संदीप पाटील,प्रा. सुधीर पाटील , प्रा. तल्हा प्रा. योगेश शिंदे,आणि अभिनव टीमचे अथक परिश्रम यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात प्रथम क्रमांकासह, १४ विद्यार्थ्यांनी ९९.५ + %ile, ३१विद्यार्थ्यांनी ९९.०० + %ile, ६७ विद्यार्थ्यांनी ९८.००+%ile, तब्बल १४८ विद्यार्थ्यांनी ९५+%ile प्राप्त केले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या गुणवत्ता परंपरेला नवे वैभव प्राप्त करून दिले आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर प्रतिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी त्यांच्यासमोर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
"यश हा योगायोग नसतो; ते उत्कृष्ट नियोजन, कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि अविरत प्रयत्नांचे फलित असते. अभिनव सायन्स अकॅडमीने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे."

No comments:
Post a Comment