तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांची अंजनाई गोशाळेला भेट; वृक्षारोपण व गोमाता पूजन



प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे...


सोयगाव, दि. १० अधिक मासानिमित्त सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेला तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी बुधवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी गोमातेचे पूजन करून फळांचा आहार खाऊ घातला.

भेटीदरम्यान गोशाळा परिसरात तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन व गोसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

यानंतर संस्थेच्या वतीने तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांचा संस्थेच्या कोषाध्यक्षा उर्मिला इंगळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव अनिल लोखंडे, कोषाध्यक्षा उर्मिला इंगळे, सदस्या पद्माबाई शिंदे, रुपाली लोखंडे, शारदा इंगळे, मीना गाडेकर तसेच सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर, राम बोडखे, ज्ञानेश्वर जाधव, राहुल जयवळ, केतन शिंदे, अथर्व इंगळे, गौरव हिरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.



No comments:

Post a Comment