'कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी च्या गजरात म्हसळ्यात पावसासाठी महादेवाला साकडे
२३ जून २०२६. (वैभव कळस )
यंदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि गावात सुख-समृद्धी नांदण्यासाठी म्हसळा येथे सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी 'श्री लखमेश्वर गाभारा भरणे व पाऊस मागणे' या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू ग्रामस्थ मंडळ, म्हसळा यांच्या वतीने या जाहीर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यावेळी भजन म्हणत सर्व ग्रामस्थ पहिले ग्रामदैवत धावीर महाराज यांच्या मंदिरात गेले. यानंतर शंकर मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर जुन्या आणि पवित्र परंपरेनुसार श्री लखमेश्वरचा गाभारा पाण्याने भरून देवाकडे सर्व ग्रामस्थ व लहान मुलानी साकडे घातले.
Labels:
23 Jun 2026

No comments:
Post a Comment