'डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीची पाहणी करून आम. अनिकेत तटकरे यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना '.-

  


२३ जून २०२३. (वैभव कळस )

म्हसळा शहराजवळ दुर्गवाडी रस्त्यावर डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. शनिवारी रात्री पुन्हा डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याचा प्रकार घडला. या धुरामुळे परिसरातील रहिवाशांचा पुन्हा एकदा कोंडमारा झाला. आगीमुळे धुराचे लोट शहरात पसरले होते. मात्र डम्पिंग ग्राऊंडला आग लागते की लावली जाते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे म्हसळेकरांचे म्हणणे आहे. 

या गंभीर प्रश्न बाबत आज विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता सर्व पाहून विधान परिषद आमदार प्रशासनावर संतापले जोपर्यंत हे सर्व सुरळीत होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला  एकही पैसा  न देण्याचा सूचना आमदारांनी मुख्याधिकारी यांना दिले त्यावेळी नागरिकांच्या तक्रारी पाहत विधानपरिषद आमदार अनिकेत सुनील तटकरे यांनी स्थळ पाहणी दरम्यान नगरपंचायत प्रशासनाला  याना जाब विचारून  तत्काळ ठेकेदाराकडून योग्य उपायोजना करून घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जलद पाऊले उचण्याचे निर्देश देऊन नव्याने उभारण्यात येणाऱ्या डंपिंग ग्राउंड चे काम धीम्या गतीने होत असल्याचे पाहून खेद व्यक्त केला व उर्वरित काम पुढील आठवडा भरात पूर्ण करा असे आदेश दिले व आलेल्या नागरिकांशी संवाद साधून समस्या समजून घेतल्या व कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन दिले निर्माण झालेला प्रश्न मोजक्या दिवसात सोडून नागरिकांना त्रास होईल असा कोणताच प्रकार करू नका दहा जुलै पर्यंत पूर्ण प्रकार नेस्तनाबूत करा असा आदेश देखील यावेळी  देण्यात आला

डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. धुरामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागला. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर पाण्याचा फवारा केला. अथक प्रयत्नाने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. मात्र धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. गेल्या तीन वर्षात म्हसळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडला अनेकवेळा आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंडला आग लागली जात असताना त्याचा शोध मात्र प्रशासन अजूनही लावू शकलेली नाही.याबाबत विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी नगर पंचायतला धारेवर धरले.



No comments:

Post a Comment