इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी
(नागपूर प्रतिनिधी : निलेश काळे)
इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन (IMPF) व आयुष ब्लड बँक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (14 जून) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अन्सारी कम्युनिटी हॉल, मोहम्मद अली सराय शाळेसमोर, मोमीनपुरा नागपूर येथे होणार आहे.
गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता व्हावी, रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका युनिट रक्तामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे IMPF च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व धर्म, जाती व वयोगटातील पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी हाफिज खान (9860706306) व सरीन अहमद (9325102481) यांच्याशी संपर्क साधावा. "रक्तदान करा, जीव वाचवा" हा संदेश देत नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment