अधिक मास समारोपानिमित्त काळे परिवारात धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न



(नागपूर प्रतिनिधी : निलेश काळे)

नागपूर : सरस्वती नगर येथील अधिक मासाच्या पवित्र पर्वाचा समारोप राजु काळे यांच्या परिवारा च्यावतीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. अधिक मासाच्या अखेरच्या दिवशी आयोजित विशेष धार्मिक कार्यक्रमात पूजन, आरती, प्रार्थना तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजनाने झाली. यानंतर उपस्थितांनी देवाच्या चरणी प्रार्थना अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिवारातील सदस्यं भक्तिरसाने भारावून गेले.

अधिक मासाच्या संपूर्ण कालावधीत काळे परिवारा च्यावतीने धार्मिक कार्यक्रम, नामस्मरण तसेच स्नेहभोज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपप्रसंगी विशेष पूजनाने करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी अधिक मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेत जीवनात साधना, श्रद्धा आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आयोजित स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला. काळे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा समारोप सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल काळे परिवाराचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment