खापरदरी गावचे विक्रम राठोड यांची प्रशासनिक अधिकारी पदावर निवड
नवतरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा; जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विजय
मानोरा(जगदीश राठोड)
मानोरा तालुक्यातील खापरदरी गावचे रहिवासी श्री विक्रम देविदास राठोड यांची प्रशासनिक अधिकारी (Administrative Officer) पदावर निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या या निवडीमुळे त्यांनी आपल्या मेहनत, शिस्त आणि अभ्यासू वृत्तीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
सामान्य कुटुंबातून येत असतानाही त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे परिसरातील नवतरुणांना मोठी प्रेरणा मिळत असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बळकट होत आहे.
राठोड यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment