'पक्षविरोधी काम करणाऱ्या सदस्यांवर कारवाई होणार'.-खास. सुनिल तटकरे


म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षांतर केलेल्या सात सदस्यांच्या अनरहता प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अनरहतेच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली असली तरी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या सदस्यांनावर पुन्हा एकदा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खास. सुनिल तटकरे यांनी दिला आहे.

म्हसळा येथे पत्रकारांशी संवाद साधताना खास. सुनिल तटकरे यांनी सांगितले कि, अनरहता ठरलेले नगरसेवक सध्या शिवसेनेत गेले असले तरी ते अधिकृतररित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याने नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करणे त्यांना बंधनकारक राहील. पक्षाचा व्ही. प. म्हणजेच पक्षादेश बजावण्यात आल्याचे सांगून त्यांचे ऊल्लंघन केल्यास संबंधितावर नियमांनुसार नियमानुसार कारवाई कारवाई करण्यात येईल. यावेळी त्यांनी पक्षांतर केलेल्या सदस्यांवर टिकास्त्र सोडले. 

म्हसळा नगराचा सर्वतोपारी आणि सर्वांगीण विकास होतं असताना ज्यांनी ज्यांनी आमचा विश्वासघात केला, आम्हाला फसवले त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनातरी फसवू नये असा टोला मारला. कारण पक्षातर केलेले काही नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी माझ्याकडे येऊन आम्हाला पुन्हा पक्षात घेण्याची विनंती केली होती, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिल्याचे तटकरे यांनी सांगितले. 

दरम्याना ७ मे २०२६  रोजी होणाऱ्या म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी पक्षविरोधी काम करणाऱ्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल असा पुनरूच्चार खास. तटकरे यांनी केला. यामुळे नगरपंचायत राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, जि. प. सदस्य अनिल बसवत, प्र. नगराध्यक्ष अनिकेत पानसरे, प. स. सदस्य लहु म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, नगरसेविका सरोज म्हशीलकर, सोनल घोले, महेश घोले, किरण पालांडे, मंगेश म्हशीलकर आदि मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment