कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण; अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध अट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात गुरनं २२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३२, ११५ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (S), ३ (२) (va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. संजयकुमार दावलु माहुरे (वय ३९), रा. दवाखाना निवासस्थान, कळमनुरी हे सरकारी वैद्यकीय सेवेत कार्यरत असून ते आंध आदिवासी समाजाचे आहेत. आरोपी बाळासाहेब यादव अप्पा घुसे (वय ४५), रा. तांबोळी गल्ली, कळमनुरी याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि. १९ मे रोजी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात ही घटना घडली. आरोपीने आपल्या नातेवाईकांना बेड का दिला नाही, या कारणावरून डॉक्टर माहुरे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपीने डॉक्टरांच्या डाव्या गालावर चापट मारून त्यांना जखमी केले तसेच त्यांच्या डोळ्यातील चष्माही फोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी हे मागासवर्गीय समाजातील असल्याची माहिती आरोपीला असतानाही त्याने हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या घटनेत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचेही नमूद करण्यात आले आहे
या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माकोडे, सपोनि शेवाळे व पोउपनि इंगळे करीत आहेत.

No comments:
Post a Comment