MCF Adventure Panchgani येथे विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी डॉ सुशांत शिंदे आंबेगाव पुणे
दिनांक १७ मे रोजी MCF Adventure Panchgani येथे आयोजित सात दिवसीय व पंधरा दिवसीय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शिबिराचा दीक्षांत सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध साहसी व सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध कसरती, रायफल शूटिंग, भाला फेक, दांडपट्टा तसेच सैनिकी शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मुंबई व पुणे येथून विद्यार्थी आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माऊंट एव्हरेस्ट स्कूल व यश करिअर अकॅडमी डायरेक्टर सुशांत शिंदे तसेच बालाजी स्कूल चे डायरेक्टर डॉ मनिषा शेवाळे उपस्थित होते. यावेळी माउंट एव्हरेस्ट स्कूल च्या प्रिन्सिपल सौ सुरेखा शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट “Best Cadet” विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. सुशांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment