मसोड-असोलवाडी रस्ता मोजणीसाठी तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी  मसोड-असोलवाडी मार्गावरील बंद करण्यात आलेल्या बैलगाडी रस्त्याच्या मोजणीसाठी महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. अखेर प्रशासनाने तातडीने रस्त्याची मोजणी करून आखणी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मसोडवरून असोलवाडी मार्गे कळमनुरीकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता काही शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अडवून ठेवल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्यामुळे मसोड, असोलवाडी व रामवाडी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची अवजारे व शेतमाल वाहतुकीसाठी तब्बल सात ते आठ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत होता.

मसोड ते असोलवाडी शिवारापर्यंतचा हा रस्ता पूर्वी डांबरीकरणासह पूर्ण करण्यात आला होता. मात्र केवळ तीन ते चारशे मीटरचा भाग काही शेतकऱ्यांनी अडविल्याने हा मार्ग बारमाही वाहतुकीसाठी बंद पडला होता. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अनेकवेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रश्नावर १८ मे रोजी तहसील कार्यालयासमोर त्यानंतर प्रशासनाने रस्त्याची मोजणी करण्यासाठी तारीख निश्चित केली होती. मात्र ठरलेल्या वेळेत मंडळ निरीक्षक व मोजणी कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने भर उन्हात वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. "वेळ नाही" असे कारण देत मोजणी पुढे ढकलण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांच्या दालनातच ठिय्या केले. आंदोलन सुरू या आंदोलनात नंदकिशोर तोष्णीवाल, उत्तम कुरवडे, उपसरपंच प्रकाश गिराम, अशोक भोजले, माजी सरपंच फकिरराव जांबुतकर, काळे, विलास भोसकर, प्रज्योत सातव, गजानन सातव, राऊत यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र "रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय उठणार नाही," असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर तहसीलदारांनी मोजणी अधिकारी व नायब तहसीलदारांना तातडीने रस्त्याची मोजणी करून आखणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, मंडळ निरीक्षक खोकले, तलाठी फोपसे तसेच मोजणी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी म. रफिक व मोजणीदार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष रस्त्याची मोजणी करण्यात आली. रस्त्याच्या खुणा कायम करून देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


No comments:

Post a Comment