चासनळी परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी.


पत्रकार:- मोहन जाधव 


                   चासनळी परिसरातील मंजूर फाटा, धामोरी फाटा व वाकद फाटा येथील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पेट्रोल व डिझेलचा पुरवठा आता दिवसा आड होत असल्याने अनेक वेळा पेट्रोल पंप बंद राहत आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीचा फटका परिसरातील शेतकरी, व्यवसायिक, शेतमजूर तसेच सरकारी नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. रोजच्या कामासाठी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना इंधनासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.


No comments:

Post a Comment