सत्तेतील लोकप्रतिनिधीमुळे कळमनुरीच्या विकासाला गती मिळणार का?
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी पक्षातील तीन दिग्गज नेत्याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून आमदार संतोष बागर तर भाजपकडून काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांच्या नावाची मोठी चर्चा सुरु आहे. आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार,याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
कळमनुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेले रामराव वडकुते यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर भाजपने त्यांना खासदारकीची संधी दिली. त्याच प्रमाणे गांधी घराण्याचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या सदस्याचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देऊन आमदार केले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघात मोठा जनसंपर्क आणि आक्रमक शैलीमुळे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. शिंदे याचे निकटवर्तीय असल्यामुळे आगामीकाळात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी सातव यांनाही मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरु आहे कळमनुरी तालुका हा विकासाच्या बाबतीत मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. औद्योगिक क्षेत्राचा अभाव, बेरोजगारीची समस्या, तसेच सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा यामुळे येथील शेतक-यांना आजही निसर्गावर अवलंबून राहावे लागत आहे. युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सताधारी पक्षाचे एक खासदार आणि दोन आमदार कळमनुरी मतदारसंघात असल्याने विकासकामाলা गती मिळेल का, उद्योग उभे राहतील का सिंचन प्रकल्पांना चालना मिळेल का आणि बेरोजगारी कमी होईल का, याकडे संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे विशेष लक्ष लागलेले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment