लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 'एच.एस.सी.' परीक्षेत घवघवीत यश; विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ९२ % निकालसह चमकदार कामगिरी


प्रतिनिधी :  गणेश ठाकरे लासलगाव:

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचालित, लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा मुलींनी कायम राखली आहे.  विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून, कला शाखेनेही ९२ टक्के निकालासह चमकदार कामगिरी केली आहे.

विज्ञान शाखेतील गुणवंत:

१) गौरी पंकज होळकर  ८०.८३% गुण प्रथम 

२) अथर्वा हेमंत नाईक (७९.६७%) द्वितीय, 

३) स्वामिनी हेमंत नाईक (७९.५०%)  तृतीय 

४) काव्या प्रकाश सांगुर्डे (७७.५०%) चतुर्थ 

५) श्रावणी प्रकाश झाल्टे व साक्षी बाळासाहेब ढगे यांनी प्रत्येकी ७७% गुण मिळवून पाचवा क्रमांक विभागून पटकावला.

कला शाखेतील यश:

१) रोहिणी रावसाहेब पवार ८७.५०% गुणांसह प्रथम

२) साक्षी पंढरीनाथ उगलमुगले (८०.६७%)  द्वितीय,

 ३) कल्याणी ज्ञानेश्वर सुपेकर (७१.१७%)  तृतीय 

४). प्रियंका विठोबा गाढे (७०.१७%) चतुर्थ 

५) प्रिती साईनाथ धनाटे (६९.६७%) यांनी  पाचवा क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा नीता पाटील, सचिव संजय पाटील , उपाध्यक्ष निवृत्ती गायकर ,संचालक अभय पाटील , सिताराम जगताप , लक्ष्मण मापारी ,.कैलास ठोंबरे इतर सर्व सन्माननीय संचालक मंडळ सदस्य , विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी, जिजामाता कन्या विद्यालयाचे प्राचार्य शारदा केदार  पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.  लासलगाव परिसरातून या गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment